गुहागर:- तालुक्यातील जानवळे येथील मयत जावेद फाकीर वनु (३७) याने घराच्या शेजारील जुन्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या संदर्भातली तक्रार गुहागर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दिनांक ११ जून रोजी रात्री ११ वाजता जावेद फकीर वनु हा घराशेजारी असणाऱ्या जुन्या घरामध्ये झोपायला गेला होता. मात्र सकाळी १० वाजताच्या सुमारास मयत व्यक्तीचा पुतण्या फरहान आदिल वनु हा त्याची गाडी घेण्यासाठी गेला असता मयत यांच्या रूमचा दरवाजा त्याला उघडा दिसला. त्यामुळे पुतण्या फहरान आदिल वनु यांनी दरवाजामधून पाहिले असता मयत मामे भाऊ हा गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. त्याने तात्काळ या संदर्भातली खबर गुहागर पोलीस स्टेशन येथे दिली. अधिक तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.