खेड:- कोकण मार्गावरून सोमवारपासून पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी १६ कोकण रेल्वेगाड्यांचे पावसाळी वेळापत्रक बिघडून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मंगळूर-सीएसएमटी एक्सप्रेस तब्बल ८ तास विलंबाने मार्गस्थ झाली. एलटीटी- तिरुवअनंतपूर नेत्रावती एक्सप्रेसलाही ७ तास लेट धावली अन्य १४ रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही परिणाम होवून झालेल्या रखडपट्टीने प्रवासी अक्षरश: मेटाकुटीस आले.
कोकण रेल्वेगाड्यांचे पावसाळी वेळापत्रक लागू झाल्याने प्रवाशांना विलंबाचा प्रवास करावा लागत आहे. त्यात कोकण रेल्वेगाड्यांच्या पहिल्याच दिवशी बिघडलेल्या पावसाळी वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका बसला. उधना-मंगळूर स्पेशल ३ तास तर सीएसएमटी-मंगळूर एक्सप्रेस २ तास २० मिनिटे. उशिराने धावली. कोच्युवेली-एलटीटी गरीबरथ ४ तास तर एर्नाकुलम एलटीटी दुरांतो एक्सप्रेस १ तास २० मिनिटे विलंबाने रवाना झाली. निजामुद्दीन-तिरुवअनंतपूरम राजधानी एक्सप्रेस २ तास २० मिनिटे, तिरुवअनंतपूरम-एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस १ तास ३० मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली.- सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस ३ तास तर कोच्युवेली- पोरबंदर एक्सप्रेस ३ तास विलंबाने रवाना झाली. पुणे – एर्नाकुलम एक्सप्रेस ३ तास ४० मिनिटे तर मडगाव-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस १ तास २० मिनिटे विलंबाने पोहचली.
रेल्वेचे पहिल्याच दिवशी वेळापत्रक बिघडले!
