चिपळूण:-तालुक्यातील खांदाट-पाली नदी पात्रात एका 60 वर्षीय वृध्दाचा मृतदेह सापडल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरेश पांडुरंग मोरे (60, आंबडस) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबतची खबर शिवाजी सुरेश मोरे (आंबडस) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश मोरे हे घरातून बेपत्ता झाले होते. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता ते कोठेही सापडून आले नाहीत. असे असताना तालुक्यातील खांदाट-पाली नदी पात्रात त्याचा मृतदेह सापडून आला.
चिपळुणात आढळला वृध्दाचा मृतदेह
