खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीतील पिव्ही कंपनीत रात्रपाळीसाठी जाणाऱया 4 कामगारांना भरधाव वेगाने जाणाऱया आयशर टेम्पोने सोमवारी रात्री 11 च्या सुमारास चिरडले. या भीषण दुर्घटनेत दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या टेम्पो चालक चांदनकुमार बिन (23, रा. उत्तरपदेश) याला महाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. रवींद्र धोंडिबा ढेबे (19), सािान शिवाजी ढेबे (18, दोघेही रा. सोलमकोंड-ढेबेवाडी, ता. महाड) अशी मृत कामगारांची नावे आहेत. संतोष ढेबे (27), नीलेश ढेबे (18, दोघे रा. सोलमकोंड-ढेबेवाडी, महाड) हे दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर महाड-बिरवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात उपार सुरू आहेत. या भीषण दुर्घटनेने सोलमकेंड-ढेबेवाडी पांकोशीत शोककळा पसरली असून ढेबे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
महाड अतिरिक्त औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या सोलमकोंड-ढेबेवाडी येथील चार तरूण नेहमीप्रमाणे पिव्ही ऑर्गनिक्श कंपनीत सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रात्रपाळीसाठी रस्त्याच्या बाजूने जात होते. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या आयशर टेम्पोने (एम.एच.48/बी.एम.2623) चौघांना चिरडले. या भीषण अपघातात 2 कामगारांना हकनाक प्राणास मुकावे लागले. तर अन्य दोघेजण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
महाडनजीक टेम्पोने चार जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर
