संगमेश्वर:-मुंबई गोवा महामार्गावरील वांद्री बौद्धवाडी येथे चिखलात गाड्या रूतल्याने महामार्ग काही काळ बंद झाला आहे. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा दिसून येत आहेत. ही घटना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
मुंबई गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहेत. वांद्री पर्यायी मार्गाने जाणाऱ्या गाड्या खड्ड्यात रूतल्याने इतर वाहने अडकून पडली आहे. येथील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत ट्रॅफिक मोकळे करण्यासाठी मदत करत आहे. या ठिकाणी चिखलात रुतलेली चारचाकी काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांनी संबधित ठेकेदाराला कल्पना देऊन चिखलात रुतलेली गाडी काढायला लाऊन साचलेला चिकल मोकळा करायला सांगितला. मात्र महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
मुंबई गोवा महामार्ग बंद,चिखलात रूतल्या गाड्या
