चिपळूण:-तालुक्यातील कळंबस्ते-खापरेवाडी येथे असलेल्या चंद्रसुमन रेसिडेन्सीमध्ये सदनिका फोडल्याची घटना रविवारी उघडकीस आली. चोरट्यांनी सदनिकेतील दागिन्यांसह रोख रक्कम असा 55 हजाराचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात रविवारी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदनिका मालक हे त्याच्या खांदाट पाली येथे गावी गेले होते. त्यामुळे त्याची सदानिका बंद होती. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यानी त्याच्या सदनिकेचा दर्शनी दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. तसेच सदनिकेतील 30 हजार किंमतीचे 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 25 हजार रोख रक्कम असा 55 हजार किंमतीचा ऐवज चोरून नेला.
या चोरीप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात रविवारी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या चोरीच्या घटनेनंतर रत्नागिरीहून श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. हा श्वान चोरी झालेल्या सदनिकेपासून अपार्टमेंटच्या तळाशी येऊन घुटमळत राहिला. चोरीच्या तपासासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले त्याव्दारे परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले जात आहेत. याच परिसरात अन्य दोन चोरी घटना घडल्याची माहिती पुढे येत आहे.