महाड:-मुंबई -गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील गांधारपाले येथे दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकी स्वार राहुल रेवाळे याचा जागीच मृत्यू झाला. आकाश पवार (रा. गोरेगाव-मुंबई) हा त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. राहुल गंगाराम रेवाळे रा. ( गोरेगाव- मुंबई) हा दुचाकीवरून आकाश पवार यांच्यासमवेत येत असताना नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात राहुल रेवाळे यांचा जागीच झाला. अपघाताचे वृत्त कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमीस तातडीने महाड रुग्णालयात दाखल करण्यात आले.