चिपळूण:- तालुक्यातील खेरशेत टोलनाका येथे शनिवारी दुचाकीचा अपघात होवून यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघाताप्रकरणी त्या दुचाकीस्वारावर सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल रामचंद्र घाडगे (30, खेरशेत-पुनवर्सन) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. अनिल हा दुचाकीने आरवली ते खेरशेत जात होता. तो खेरशेत टोलनाका येथे आला असता त्याला रस्त्याची विशिष्ठ परिस्थिती लक्षात न आल्याने त्याची दुचाकी डीव्हायडरला आदळली. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने यातच त्याचा मृत्यू झाला होता. या अपघातप्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टोलनाक्यावर अपघातप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा
