खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील काळकाई हॉटेलसमोर इको कारने रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने 45 वर्षीय प्रौढ जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास घडली. भाऊ भोसले (रा. तिसंगी) असे जखमी प्रौढचे नाव आहे. अपघाताचे वृत्त कळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. सामाजिक कार्यकर्ते सुरेश हंबीर यांनी रूग्णवाहिकेने तातडीने उपचारासाठी भरणे येथील रॉयल हॉस्पीटलमध्ये जखमीला दाखल केले. अपघातात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.