खेड:-तालुक्यातील आवाशी-माळवाडी येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड टाकली. या धाडीत 3 हजार रूपये किमतीचा माल जप्त करत महादेव गंगाराम उमासरे (64, रा. आवाशी-माळवाडी) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. तो बेकायदेशीरपणे घराच्या पाठीमागील सिमेंट पत्र्याच्या पडवीत विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकत त्याला रंगेहाथ पकडले. या धाडीत 30 हजार लीटर दारू पोलिसांनी जप्त केली आहे.