देवरुख:-संगमेश्वर तालुक्यातील काटवली केदारलिंग गावमंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडण्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. पुरावा राहु नये म्हणून चोरट्यांनी सीसीटीव्ही स्टोरेज सिस्टीमही गायब केली आहे.
केदारलिंग गावमंदिर 8 रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले. 9 रोजी पुजारी सकाळी 10 वाजता पुजा करण्यासाठी मंदिरात गेले असता, चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही बाब त्यांनी ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिली. देवरूख पोलीस ठाण्यात या घटनेची खबर देण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय पाटील व सहकाऱ्यानी घटनास्थळी भेट देवून पाहणी व पंचनामा केला.
चोरट्याने मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केली. मंदिरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वीत होती. ही बाब चोरट्यांच्या निदर्शनास आल्याने मुख्य गाभाऱ्याचे कुलूप तोडून सीसीटीव्ही स्टोरेज सिस्टिमही गायब केली आहे. याप्रकरणी अज्ञातावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.