6 धावांनी पराभूत केले
क्रिकेट : 120 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने आक्रमक सुरुवात केली. तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराह यानं बाबर आझम याला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. पण दुसऱ्या बाजूला अनुभवी मोहम्मद रिझवान तळ ठोकून उभा होता. त्यानं आपला अनुभव पणाला लावत पाकिस्तानला विजयाच्या दिशेने आगेकूच केली. दुसऱ्या बाजूला विकेट पडत होत्या, पण रिझवान चिवट फलंदाजी करत होता. पाकिस्तानला 48 चेंडूत फक्त 48 धावांची गरज होती. सामना पाकिस्तान जिंकणार असेच सर्वांना वाटत होतो. पण 15 व्या षटकात जसप्रीत बुमराहने रिझवानचा त्रिफाळा उडवला अन् भारताच्या विजयाच्या आशा जिवंत केल्या. रिझवानची विकेट हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
भारताच्या गोलंदाजांचा भेदक मारा, सामना फिरवला..
पाकिस्तानला विजयासाठी 48 चेंडूत 48 धावांची गरज होती, आठ विकेट हातात होत्या. मोहम्मद रिझवान आणि फखर जमान हे अनुभवी फलंदाज मैदानात होते. हार्दिक पांड्याने 13 व्या षटकात फखर जमान याचा अडथळा दूर केला. त्यानंतर 15 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जसप्रीत बुमराह यानं मोहम्मद रिजवान याचा त्रिफाळा उडवला. मोहम्मद रिजवान 44 चेंडूत 31 धावांवर खेळत होता. तो लयीत होता, अनुभवाच्या जोरावर सामना केव्हाही फिरवण्याची त्याची क्षमता होती. बुमराह याने रिझवान याला तंबूत पाठवत भारताच्या विजयाच्या आशा उंचावल्या. त्यानंतर सादाब खान, इफ्तिखार अहमद आणि इमाद वासीम यांनी ठरावीक अंतराने विकेट फेकल्या. त्यात खूप निर्धाव चेंडू गेले. परिणाणी अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजायासाठी 17 धावांची गरज होती. अर्शदीप सिंह यानं 11 धावा खर्च करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केेले.