रत्नागिरी:-मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तारवेवाडी महामार्गाचे काम करत असलेला कामगाराला धडक देणाऱ्या कारचालकावर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सिद्धेश उर्फ बाळा अनंत देसाई (रा.हातखंबा रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांकडून आरोपी याला गुन्ह्याच्या तपासकामी नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आह़े. हातखंबा तारवेवाडी येथे हसन विक्रम सुवर्णकार (42, रा. पाली मुळ बिहार) हा सिमेंट काँकिट करणारे मशीनजवळ काम करत होत़ा 25 मे 2024 रोजी सिद्धेश देसाई याने कारने (एमएच 43 एएल 3795) हसन सुवर्णकार याला जोराची धडक दिली. या अपघातात हसन हा जखमी झाल़ा पोलिसांनी याप्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा ठपका ठेवत सिद्धेश याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
हातखंबा येथे कामगाराला धडक देणाऱ्या कारचालकावर गुन्हा
