रत्नागिरी:-तालुक्यातील गावखडी येथील समुद्रकिनारी पाण्यावर पिवळा तवंग दिसून आला. मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा हा परिणाम आहे की, यामागे अन्य काही कारण आहे का, या बाबत माहिती घेतली जात आह़े. दरम्यान समुद्रकिनारी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या रहिवाशांच्या ही बाब निदर्शनास आल़ी. सुमारे तीन ते चार मीटर पिवळा तवंग दिसत आह़े. या बाबतची माहिती प्रशासनाला देण्यात आली असून त्या बाबत माहिती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.