खेड:-दापोली-काळकाईकोंड येथे एकास चौघांनी बेदम मारहाण करत जखमी केल्याचा ठपका असलेल्या चौघांची ऍड. स्वप्निल खोपकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत दापोली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यानी चौघांची निर्दोष मुक्तता केली. अशोक दत्ताराम दाभिळकर, अमृता अशोक दाभिळकर, अक्षय अशोक दाभिळकर, हर्षवर्धन जनार्दन दाभिळकर अशी त्यांची नावे आहेत. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून फावड्यासह दांडक्याने मारहाण करत गंभीर दुखापत केल्याप्रकरणी त्यांच्यावर दापोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सुनावणी झाली असता 4 ची निर्दोष सुटका करण्यात आली.