गुहागर:-गुहागर तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून गुरूवारी आलेल्या वादळी पावसाने 13.8 मिलिमिटर नोंद केली आहे. तर भातगाव धक्का व पालपेणे येथे दोन घरांचे नुकसान झाले आहे.
गुहागर तालुक्यात गेल्या सात दिवसात 25.6 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. गुरूवारी रात्री व शुक्रवारी पहाटे कोसळलेल्या पावसामध्ये गुहागर मंडळ मध्ये 21 मिलिमिटर, पाटपन्हाळेमध्ये 14 मिलिमिटर, हेदवीमध्ये 9 मिलिमिटर, आबलोलीमध्ये 12 मिलिमिटर तर तळवलीमध्ये 13 मिलिमिटर असे एकूण सरासरी 13.8 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या चार ते पाच दिवसात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याचे तहसिलदार परिक्षीत पाटील यांनी कळवीले आहे.
गुरूवारच्या पावसामध्ये भातगाव धक्का येथील गंगाराम देमा वनये यांच्या घराच्या भींतीवर झाड पडून घराचे पत्रे फुटून, भिंतींना तडा गेल्या आहेत. एकूण 20 हजार रूपये नुकसानीची नोंद करण्यात आली आहे. पालपेणे येथील महेश बबन अहिरे यांच्या घराच्या पडवीवर शिवनाचे झाड पडल्याने घराची कौले, वासे यांचे एकूण 6500 रूपयाचे नुकसान झाले आहे.