कडवई: संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे शासकीय हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण होत आले आहे.सदर हॉस्पिटल नूतन इमारतीत चालू करण्यापूर्वी संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी, इ. सी. जी.,एम.आर.आय, डायलेसिस,रक्तपेढी,स्किटी स्कॅन,इत्यादी सर्व प्रकारच्या अद्यावत सुविधा सुविधा आणि तज्ञ डॉक्टर यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच हॉस्पिटल सुसज्ज आणि अद्यावत झाल्यावरच सुरू करण्यात यावे,यासाठी सुमारे 25 जणांचे शिष्टमंडळ काँग्रेस आणि शेतकरी -कष्टकरी संघटना व चिपळूण – सगमेश्वर विधानसभा मतदार संघाच्या वतीने मा.तहसिलदार देवरुख अमृताजी साबळे यांना निवेदन देण्यात आले.
या शिष्टमंडळाचे नेतृत्व मा. अशोकराव जाधव यांनी केले.यावेळी त्यांच्यासोबत विश्वनाथ किल्लेदार , दिपक दळवी , विलास कदम , दयाराम पवार,विजय शिंदे,प्रितम बांडागळे,सचिन आपिष्टे, रविंद्र लांजेकर,इंद्रजित शिंदे,हनिफ धामणस्कर,दिपक जाधव,नंदकुमार सावंत,पांडूरंग माने,सुरेंद्र जाधव, स्वतेज शेटे,विश्वास गुरव,अमित देसाई,रामचंद्र लोहार इत्यादी काँग्रेस आणि शेतकरी-कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.