रत्नागिरी:-शहरानजिकच्या कुवारबाव येथील गटारात पडून बेशुद्ध झालेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेजस रामचंद्र जाधव (वय 28, रा. कातळवाडी पालगड, ता. दापोली ) मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. 6) रात्री आठच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेजस गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कुवारबाव येथील गटारात पडून बेशुद्ध झालेल्या अवस्थेत आढळला. नागरिक व पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले. उपचार सुरु असताना रात्री आठच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.