गुहागर:-गुहागर तालुक्यातील देवघर येथे नदीशेजारी सडलेल्या अवस्थेत आढळलेल्या गणेश मानेचा प्रियकराच्या मदतीने खून करणाऱ्या पत्नी व प्रियकराला चिपळूण न्यायालयाने 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुहागर तालुक्यातील देवघर येथील नदीकिनारी मृत स्थितीत व कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या गणेश माने याचा त्याची पत्नी जयश्री माने व तिचा प्रियकर प्रदीप सिताराम कदम या दोघांनी डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याचे समोर आले. गुहागर पोलिसांनी अवघ्या 24 तासात या खुनाचा उलगडा केला आहे. या दोघांना बुधवारी पहाटे अटक केली. त्यानंतर त्यांना चिपळूण न्यायालयात हजर केली असता 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.