रत्नागिरी:-वर्ग मैत्रिणी सोबत गैरवर्तन करून विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या तरुणाची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
रत्नागिरीतील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुण-तरुणीची 6 महिन्याच्या ओळखीनंतर चांगलीच मैत्री झाल़ी. ही तरुणी आपल्याला न सांगता वर्गातून कॉलेजच्या मैदानात गेल़ी याचा राग मनात धरुन मित्राने तिच्या कानाखाली मारल़ी. यामुळे त्या दोघांचे संबंध तणावाचे बनल़े. पुढे त्याने पाठपुरावा केला आणि फोनवरुन शिवीगाळ केली, अशा स्वरुपाची फिर्याद रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दाखल झाल़ी. 5 ऑक्टोबर 2018 ला हा मारहाणीचा प्रकार घडल्याचे त्यात नमूद करण्यात आल़े. निखील दादा पवार (26,ऱा रत्नागिरी) असे आरोपीचे नाव असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल़े आहे. हे प्रकरण तपासाअखेर न्यायालयात सादर झाल़े. पुष्पलता शांताराम नाडणकर या पोलीस अधिकाऱ्यानी तपास काम पूर्ण केला. त्याची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी ऱा म़ चौत्रे यांच्यासमोर झाल़ी. सुनावणीवेळी सरकार पक्षाने पुरावे सादर केल़े. त्यानंतर न्यायालयाने निर्णय दिल़ा. गुन्ह्याची घटना 11 ऑक्टोबर की 12 ऑक्टोबर रोजी घडली. याविषयी फिर्यादी व अभियोग पक्षाचे अन्य साक्षीदार यांच्यात विसंगती आढळल़ी. त्रयस्थ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध होत नाहीत़. दोन साक्षीदारांची साक्ष ही ऐकीव स्वरुपाची आह़े. आरोपीच्या मोबाईलवरुन फोन कॉलद्वारे होत असलेला पाठपुरावा तांत्रिकदृष्ट्या अपयशी ठरल़ा.
घटनास्थळ पंचनामा शाबीत झाल़ा. आरोपीने तरुणीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने पाठलाग अगर पाठपुरावा केला व तिला शारिरीक दुखापत पोचवून मोबाईल फोनद्वारे मानसिक दुखापत, धमकावण्याचा प्रयत्न केल़ा या गोष्टीसाठी अभिलेखावर कोणताही पुरावा आलेला नाह़ी. म्हणून संशयाचा फायदा आरोपीला देण्यात येत आहेत, असे सांगून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आल़ी.