खेड:-तालुक्यातील मेटे-पाटीलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या पडवीत 40 वर्षीय तरूणाने अज्ञात कारणावरून गळफासाने आत्महत्या केली. महेश सखाराम पंडित (रा. मेटे-पाटीलवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. 6 जून रोजी सकाळच्या सुमारास ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. या बाबत खेड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.