राजापूर:-राजापूर तालुक्यात गुरूवारी रात्री वीजांचा गडगडाट आणि ढगांचा कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. पाऊस कोसळत असतानाच वारंवार विजपुरवठा खंडीत होत असल्याने तालुकावासीय हैराण झाले होते. दरम्यान गुरूवारी सायंकाळी तालुक्यातील शिवणेखुर्द येथील जयप्रकाश वैद्य यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे.
गुरूवारी रात्री दमदार पाऊस कोसळला. रात्री अचानक वातावरणामध्ये बदल होवून ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर रात्रभर जोरदारपणे पाऊस कोसळत होता. पावसामुळे रात्रभर सातत्याने खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे सर्वसामान्य मात्र चांगलेच हैराण झाले होते. दरम्यान, काल सायंकाळी तालुक्यातील शिवणेखुर्द येथील जयप्रकाश वैद्य यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. मात्र, नुकसानीचा निश्चित आकडा समजू शकलेला नाही.
राजापुरात घराची भिंत कोसळून नुकसान
