रत्नागिरी/प्रतिनिधी:- रत्नागिरीतून मुंबईला जाणाऱ्या
ऍम्ब्युलन्सला कशेडी बोगद्यातून जाण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी सूचना ना.सामंत यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी कि बशीर हजवानी फौंडेशनची रत्नागिरी येथील ऍम्ब्युलन्स मुंबई येथे जात असताना त्यांना कशेडी बोगद्यातून जाण्यास मनाई करण्यात आली. आणि तसेच मुंबईतुन परत येतानासुद्धा या ऍम्ब्युलन्सला अटकाव करण्यात आला. यावेळी चालक शमी मुकादम यांनी ऍम्ब्युलन्स जाण्यासाठी कुणी मनाई केली तसेच ऍम्ब्युलन्स जाऊ नये म्हणून लोखंडी खांब कोणी उभारले याबाबत विचारणा केली. तर पोलिसांनी हे काम ठेकेदारांनी केले आहे असे सांगितले.तर ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी हे पोलिसांनी केल्याचे सांगितले.
हा सगळा प्रकार लक्षात घेऊन अखेर अँब्युलन्स चालक शमी मुकादम यांनी सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांना फोन करून हा विषय त्यांना सांगितला. आणि झालेला प्रकार सोशल मीडियाला शेअर केला. याची दखल तात्काळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ऍम्ब्युलन्स जाईल अशा प्रकारची सोय करण्याची सूचना केली.
कशेडी बोगद्यातून ऍम्ब्युलन्स जाण्याची सोय केल्याने कशेडी घाट मार्गे मुंबई जाण्यासाठी वेळ लागत असल्याने ऍम्ब्युलन्समध्ये ही रुग्णाला त्रास होत होता. तसेच वेळ ही अधिक जात असल्याने रुग्णाला मुंबई पोहचण्यास विलंब होत होता. आता कशेडी बोगदयातून ऍम्ब्युलन्स जाण्याची सोय झाल्याने रुग्ण सुद्धा लवकर मुंबई ला उपचारासाठी पोहचू शकतो.
या ऍम्ब्युलन्सचे चालक शमी मुकादम आणि बशीर हजवानी फौंडेशन रत्नागिरी ऍम्ब्युलन्स शाखेचे प्रतिनिधी फैयाज मुकादम यांच्या या दक्षते मुळे मोठी सोय निर्माण झाली आहे.रत्नागिरी मजगांव सरपंच तथा ऍम्ब्युलन्स प्रतिनिधी फैयाज मुकादम यांनी ना. उदयजी सामंत, किरण सामंत यांचे आभार मानले आहे.
कशेडी घाटातून ऍम्ब्युलन्स वाहतुकीसाठी उदय सामंतनी दिल्या सूचना
