देवरुख:-नजीकच्या पूर फाटा येथे जमीन जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीमध्ये दोघेजण जखमी झाले. तिघाजणांवर देवरूख पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल रमेश रसाळ (22, रा. पूर फाटा) याने फिर्याद दिली. राहुल राठोड, निलम राठोड, संतोष राठोड (सर्व रा. पूर फाटा) अशी आरोपींची नावे आहेत. रसाळ व राठोड यांच्यामध्ये जमीन जागेवरून वाद आहेत. राठोड हे साहिल रसाळ यांच्या आजीला घरात जावून मारहाण करत होते. यावेळी साहिल रसाळ घरामध्ये गेला असता राहुल राठोड याने साहिलच्या डोक्यात रॉड मारला. तसेच निलम व संतोष याने साहिलला मारहाण केल्याचे दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मारहाणीत साहिल रसाळ व पुष्पा शंकर रसाळ हे दोघेजण जखमी झाले.
साहिलने दिलेल्या फिर्यादीनुसार राहुल, निलम व संतोष राठोड यांच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात भा.दं. वि. कलम 452, 323, 324, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवरुखात जागेच्या वादातून दोघांना मारहाण, तिघांवर गुन्हा
