चिपळूण:-येथील हॉटेल व्यावसायिकाला वॉटरपार्क बनवण्यासाठी मागवलेल्या साहित्यात 13 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी एम. एस टेन्ड वॉटर रायडस पा. लिमिटेड वसई-मुंबईतील कंपनीच्या मालकीणीसह व्यवस्थापकीय सांलकावर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा फसवणुकाचा गुन्हा रेहेळ-भागाडी येथील वृक्षवल्ली रिसॉर्ट येथे 5 जानेवारी 2024 ते 5 जून या कालावधीत घडला.
याबाबतची फिर्याद विजय धनंजय जठार (60, एफ-4 प्रणव प्लाझा ओझरवाडी) यांनी दिली असून रेश्मा गोरे, सचिन उतेकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जठार यांनी एम. एस टेन्ड वॉटर रायडस पा. लिमिटेड या वसई-मुंबईतील कंपनीच्या मालकीन रेश्मा गोरे व व्यवस्थापकीय संचालक सचिन सुदाम उतेकर यांना वॉटर पार्क बनविण्याकरीता लागणारे सामान व त्यामध्ये वॉटर राईटस इन्स्टॉलेशन तसेच त्या करीता लागणाऱ्या वस्तूंसाठी दोघांमध्ये ठरलेल्या करारनाम्यानुसार रोख रक्कम तसेच धनादेश स्वरुपात 13 लाख 80 हजार रूपये अदा केले आहेत. असे असताना जठार यांच्या प्रोजेक्टरच्या ठिकाणी उतरविण्यात आलेल्या वस्तूंचे वर्णन, लांबीत दिशाभूल करुन अफरातफर करत जठार यांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यामुळे या दोघांवर भादंवि कलम 406, 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेल व्यावसायिकाला साडेतेरा लाखाला फसवले
