दापोली:-दापोली तालुक्यातील आंजर्ले ताडाचा कोंड येथील राकेश रामचंद्र शिगवण या 28 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र शिगवण यांचा मुलगा राकेश हा आंजर्ले ताडाचा कोंड येथे वास्तव्याला होता. त्याला दारूचे व्यसन लागले होते. बुधवारी व्यसनाधीन अवस्थेत त्याने आंजर्ले ताडाचा कोंड येथील त्याच्या घराच्या बाजूला असणाऱ्या काजूच्या झाडाला दोरीने गळफास लावून घेतला. रामचंद्र शिगवण यांना हे निदर्शनास आल्यानंतर त्याला उपचारासाठी आंजर्ले येथे सरकारी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले. दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.
दापोलीत 28 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
