रत्नागिरी:- नेत्रावती एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या तामिळनाडू येथील तरूणाच्या छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासून मृत घोषित केले. बी सुकुमार (42, रा. पेरीयार नगर, नॉर्थ विरुता चलम, कडलूर तामिळनाडू) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी 4 मे रोजी रात्री 9 च्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बी सुकुमार व त्यांची पत्नी मुंबईहून नेत्रावती एक्स्प्रेसने तामिळनाडू येथे जात होते. संगमेश्वर ते आरवलीदरम्यान त्यांच्या छातीत दुखू लागले. टीसी व प्रवासी डॉक्टर यांनी त्यांना तपासले. ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यानंतर रत्नागिरी येथे उतरुन त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या तामिळनाडूतील प्रवाशाचा मृत्यू
