रत्नागिरी : अंमली पदार्थ कादद्याखाली दाखल झालेल्या गुह्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा असा अर्ज सुरज संभाजी पाटील (30) रा. कवठेपिरन, तालुका मिरज, जिल्हा सांगली) याने सत्र न्यायालयासमोर केला होता. न्यायालयाने तो फेटाळून लावला. ही बाब संबंधीतांना कळवावी असेही न्यायालयाने नमूद केले.
सुरज पाटील याने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयाने पोलीसांचे म्हणणे मागून घेतले. त्यानुसार 14 नोव्हेंबर 2023 रोजी पोलीस कर्मचारी मार्लेश्वर परिसरात वाहने तपासणी करत होते. सायंकाळी 8: 50 वा. मारुती अल्टो गाडी तेथे पोहचली. त्या गाडीला नंबर प्लेट नव्हती. पोलीसांनी गाडी थांबवली आणि तपासणी सुरु केली. तेथून पळून जाण्याचा पयत्न चालकाने केला. पोलीसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडे कागद पत्रांची मागणी केली. चालकाने असंबद्ध उत्तरे दिली. यामुळे वाहनाविषयी संशय वाढला. पोलीसांनी 2 पंच साक्षीदार बोलावले.
पंचाच्या समक्ष चालकासह चौघांनी आपली नावे सांगितली. वाहनामध्ये शोध घेतला असता 1 सॅक सापडली. प्लास्टीक पाऊच मध्ये 1.9 किलो गांजा सापडला. त्यानंतर सर्व आरोपींची कोठडी पोलीसांनी घेतली. आपण गुन्हा केला नाही असे कथन आरोपीने केले.
पोलीसांनी केलेल्या तपासात संबंधीत खेड्यामध्ये सापडून आला नाही. असे अहवालात नमूद करण्यात आले होते. पोलीसांनी 4 वेळा आरोपीला अटक करण्याचा पयत्न केला पण त्यात यश आले नाही. तपास अधिकाऱ्यानी म्हटल की आरोपी हा खून तसेच सरकारी कामात अडथळा या सारख्या दोन गुह्यात गुंतला आहे. अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या दोन पकरणांमध्ये देखील अडकला आहे. त्याची कोठडी तपास अधिकाऱ्याना आवश्यक आहे. अतिरीक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार मल्लीकार्जुन आंबळकर यांनी उभय बाजू ऐकून आरोपीचा अर्ज फेटाळून लावला.
