खेड : खेड नगर नगरपरिषदेच्या कार्यालयासमोरील उद्यानात एका प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. हा मृत प्रौढ सातारा येथील रहीवासी असल्याचे समजते. येथील पोलिसांकडून त्याची सायंकाळी उशिरापर्यंत ओळख पटवण्याचे काम सुरू होते. त्याने मद्यप्राशन केल्यानंतर तो उद्यानात निपचित पडला होता. काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर गर्दी केली. अखेर गृहरक्षकदलाचे संजय कडू यांनी 108 रुग्णवाहिकेस संपर्क साधत पोलीस स्थानकात खबर दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. सायंकाळी उशिरा त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. त्याचे कुटुंबीय सोमवारी सकाळीच सातारा येथे गेले होते. प्रौढाला देखील सातारा येथे येण्याचा आग्रह करण्यात आला होता. मात्र त्यांच्यासोबत न जाता त्याने मद्यप्राशन केले. भर उन्हातच नगरपरिषदेच्या कार्यालयासमोरील उद्यानात पडला होता. याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
