( खेड )
तालुक्यातील पिरलोटे येथील चिरणीकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक डंपरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. लक्ष्मण मनोहर येळवी (42 सध्या रा. चिरणी रोड) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. यापकरणी डम्पर चालकावर खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदू दौडामणी (रा. वालोपे चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्या डम्पर चालकाचे नाव आहे. यातील दुचाकीस्वार लक्ष्मण येळवी हे आपल्या ताब्यातील एम.एच. 12 जे.बी. 8928 क्रमांकाच्या दुचाकीवरून पिरलोटे येथून लोटे गावठणवाडी येथे जात होते. यावेळी चंदू दौडामणी हा आपल्या ताब्यातील डम्पर (एम.एाा. 08 ए.पी. 1707) घेवून जात असताना दुचाकीला पाठीमागून धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, डम्परचे चाक दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून गेल्याने जागा मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त कळताच लोटे येथील पोलीस दूरक्षेत्राचे कर्माच्री घटनास्थळी पोहून पंचनामा केला. याप्रकरणी डम्पर चालकावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
