( महाड )
शहरातील एका व्यापाऱ्याच्या मुलाने अतिवेगाने कार चालवण्याचा प्रताप केला. मात्र हा प्रताप त्याच्या अंगलट आला आहे. गाडी वेगाने चालवून रस्त्याच्या एका विद्युतखांबाला जोरदार धडकल्याने मोठा अपघात झाला. मात्र सुदैवाने तो बचावला.
महाड शहरातील एका इलेक्ट्रॉनिक दुकान व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने अतिवेगाने कार चालवली. या मुलाचे वय 17 वर्ष इतके असून तो एम.एच.06/सी.डी.6843 क्रमांकाची कार चालवतहोता. शहरातील महात्मा गांधी मार्गावरील महाड बेकरीकडून छत्रपती शिवाजी महाराज मार्गाकडे जाण्यासाठी भरधाव वेगाने कार वळवली. कार वळवली असता नियंत्रण सुटून समोरील विद्युतखांबावर जावून धडकली.
या मार्गावर नागरिकांची मोठी वर्दळ सुरू होती. कार धडकणार असल्याचे निदर्शनास येताच तेथून नागरिकांनी धूम ठोकली. हा मुलगा अल्पवयीन असल्याने मुलाचे वडील सुरेश परमार यांच्याविरोधात महाड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास महाड शहर पोलीस करत आहेत.
