रत्नागिरी:-कोकण पदवीधर मतदारसंघातून सोमवारी काँग्रेस पक्षाकडून रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक रमेश कीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि मुंबईचे माजी महापौर राजेश शर्मा, काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आबा दळवी, तसेच पनवेल येथील काँग्रेसचे पदाधिकारी सुदाम पाटील आदी उपस्थित हेते.
कोकण पदवीधर मतदार संघासाठी 26 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 31 मे ते 7 जून पर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. तसेच या उमेदवारी अर्जांची छाननी 10 जून 2024 रोजी होणार असून 12 जून 2024 रोजी अर्ज मार्ग घेण्याची मुदत आहे. कोकण भवन येथिल आयुक्त कार्यालयात हे अर्ज दाखल करायचे आहेत. सोमवारी रमेश कीर यांनी आपला उमेदवारी अर्ज अमोल पाटील (उपायुक्त सामान्य प्रशासन) यांच्यासमोर दाखल केला. यावेळी कीर यांच्यासोबत काँगेसचे पदाधिकारी उपस्थीत होते.