खेड:-शहरातील एकविरा नगर येथे वास्तव्यास असलेल्या एका तरुणाची तब्बल 24 लाख 85 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक न करता कंपनीत जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फसवणूक केल्याचे लक्षात येताच तरूणाने पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली. त्यानुसार सोमवारी सायंकाळी उशिरा अज्ञातावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत विक्रांत विजय दांडेकर (40, रा. एकविरा नगर, खेड) यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ही घटना 19 एप्रिल ते 24 मे या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तो फसबुक अकाऊंट चालवत असताना शेअर मार्केट ट्रेडिंग लिंक दिसली. त्या लिंकवर त्याने क्लिक केले असता व्हॉटस्ऍप ग्रुपवर जाँईंट होण्यास सांगितले. त्यासाठी अनोखळी इसमाने दोन मोबाईल नंबर पाठवत व्हॉटस्ऍप ग्रुप जॉईंट करण्यास सांगितले.
वैयक्तिक शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यापेक्षा कंपनीत पैशांची गुंतवणूक करत जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार सुरूवातीला गुगल पे द्वारे 10 हजार रूपये रक्कम पाठवले. त्यानंतरही सहावेळा खात्यातून रक्कम पाठवल्या. तब्बल 24 लाख 85 हजार रूपये पाठवून देखील जादा रक्कम परतावा त्याला मिळालेला नाही. अखेर फसवणूक झाल्यो लक्षात येता तरूणास एका धक्का बसला.