रायगड:-मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर हद्दीत रविवारी पहाटेच्या सुमारास सुसाट धावणारी खासगी आरामबस थेट सर्व्हिस रोडसह गटारावर चढल्याने प्रवाशांचा थरकाप उडाला. मात्र, सर्व प्रवाशी सुखरूप असल्याचे निदर्शनास येता साऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
आत्माराम ट्रव्हल्स व्होल्वो खासगी आरामबस मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती. ही बस पोलादपूर-प्रभातनगर येथे आली असता हॉटेल गोल्डन पॅलेससमोरच्या सर्व्हिस रोड व महामार्गावरील काँक्रिटच्या गटारवजा फूटपाथवर तब्बल दीडशे फूट अंतरावर कर्णकर्कश आवाज करत चढली. चालक जस्मिन सोहनी याचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकाला घासत पुढे गेली. या बसमधील दोन चालकासह 49 प्रवाशी सुदैवाने बचावले.
खासगी बस चढली सर्व्हिस रोडसह गटारावर
