रत्नागिरी:-अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाचा जामीन अर्ज येथील विशेष न्यायालयाने फेटाळून लावला. पीडित मुलगी आणि आरोपी तरुण हे समाजमाध्यमांद्वारे एकमेकांच्या संपर्कात आले. त्यातून त्यांची मैत्री झाली होती. या माध्यमातून त्यांची जवळीकता वाढत जाऊन आरोपीने याचा गैरफायदा घेत पिडीतेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील इतर काही आरोपी अद्याप पसार आहेत. पुराव्यामध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे, असे नमूद करुन विशेष न्यायालयाने राजू गोविंद अनारसे याचा जयगड पोलीस स्थानकात दाखल झालेल्या गुन्हाप्रकरणी जामीन अर्ज फेटाळला.