चिपळूण:-चोरट्या पध्दतीने ताडी-माडीचा व्यावसाय करण्यासाठी विनापरवाना केलेला ताडी-माडीसाठा अलोरे-शिरगाव पोलिसांनी जप्त केल्याची घटना तालुक्यतील अलोरे येथे रविवारी घडली. याप्रकरणी दोघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून तब्बल लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुनील धोंडू शिंदे (63), शंकर गंगाराम ताम्हणकर (61, दोघे-अलोरे) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. याबाबतची फिर्याद जगन्नाथ दिनकर चव्हाण (41, अलोरे-शिरगाव पोलीस स्थानक) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील शिंदे, शंकर ताम्हणकर यांनी ताडी-माडा चोरटा व्यवसाय करण्याकरिता ताडी-माडी विनापरवाना स्वत:जवळ बाळगली होती. या घटनेची माहिती आलेरे-शिरगाव पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी आलोरे-देवरेमार्केट येथे एका झोपडीत धाड टाकून पत्येकी 200 लिटराया 10 प्लास्टिकच्या कॅनमधून 72 हजार रूपये, 300 लिटर प्लास्टिकच्या 3 टाक्यांमधून 32 हजार 250 रुपये, पत्येक 20 लीटाया 5 कॅनमध्ये 4 हजार रूपये असा 1 लाख 8 हजार 550 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.