नवी दिल्ली: सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. अमूल दुधाच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. अमूल ब्रँड अंतर्गत दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. अमूलच्या नवीन किमतींनुसार, अमूल गोल्ड ५०० मिली लिटरमागे २ रुपयांनी वाढून ३३ रुपये झालं आहे. सोमवारपासून या किंमती लागू होणार आहेत.
अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी स्पेशल दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता अमूल गोल्डची किंमत ६४ रुपये लिटरवरुन ६६ रुपये लिटर होणार आहे. तर अमूल टी स्पेशलची प्रति लिटर किंमत ६२ रुपयांवरून ६४ रुपयांपर्यंत वाढणार आहे. एवढंच नाही तर अमूल शक्तीचा भाव ६० रुपयांवरून ६२ रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढणार असून, दह्याचे दरही वाढले आहेत.