संगमेश्वर:-देवरूख शहरात राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरूणीचा कोल्हापुर येथील रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेची नोंद देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार अस्मिता विनोद शिलवंत असे मृत तरुणीचे नाव आहे. अस्मिता हिच्या पायाला गेली तीन महिने सुज आली होती. यामुळे तिला चालता येत नव्हते. तिच्यावर अनेक ठिकाणी उपचार करण्यात आले. मात्र ती बरी होत नव्हती. तिला अधिक उपचारासाठी कोल्हापुर येथील सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना अस्मिता हिचे निधन झाले. ऐन उमेदीच्या वयातच मुलगी गेल्याने शिलवंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची नोंद शनिवारी देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आली.