खेड:-तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचा काही अटी शर्थिंवर खेड जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला.
दरम्यान पीडित अल्पवयीन मुलीबरोबर संशयित आरोपी अनिल निकम (रा. देवघर, ता.खेड, जि. रत्नागिरी) याने बालविवाह केला होता. त्यानंतर तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामध्ये ती गरोदर राहीली. अल्पवयीन असल्याने गरोदर राहिल्याची तक्रार खेड पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली.
यानंतर खेड पोलीसांनी पिडीतेचा जबाब नोंदवून घेत आरोपी अनिल निकम याच्यावर भा.द.वि कलम 376 (2) (क्ष), 376 (2) (प), बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8, 10, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 चे कलम 9, 10 नुसार गुन्हा दाखल केला. त्यानुसार 10 मे 2024 रोजी अनिल याला अटक करण्यात आली. अनिल याच्यावतीने खेड जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामीन अर्ज दाखल केला होता. संशयिताच्यावतीने अॅड. स्वरूप सुबोध थरवळ यांनी जामीन अर्जावर युक्तीवाद केला. अॅड. थरवळ यांचा युक्तीवाद व उच्च न्यायालयाचे निकाल ग्राहय धरून संशयित आरोपीचा जामीन काही अटी व शर्थीवर मंजूर करण्यात आला.