चिपळूण:- पावसाळ्यात शहरामध्ये पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या दृष्टीने या सामाजिक भावनेतून क्रेडाई चिपळूण संघटनेतर्फे अदयावत यांत्रिकी जीवन रक्षक ( बोट ) चिपळूण नगरपरिषदेच्या आपत्ती निवारण विभागाकडे नुकतेच सुपूर्द करण्यात आली.
या अनुषंगाने मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या समवेत दिनांक २९ मे रोजी झालेल्या चर्चेप्रमाणे गुरुवार दिनांक ३० मे रोजी नोडल अधिकारी मंगेश पेढांबकर यांच्याकडे क्रेडाई चिपळूणचे अध्यक्ष संतोष तडसरे, महाराष्ट्राचे जॉईट सेक्रेटरी राजेश वाजे सदरची बोट सुपूर्द करीत असल्याचे पत्र व बोट दिली.
त्यावेळी संघटनेचे सेक्रेटरी शकील चौगुले, ट्रेझरर राहूल काळी, विनय काळी, शामकांत कदम, जावेद दलवाई, मन्सूर देसाई, प्रसाद खातू, बळीराम मोरे, समीर मेमन, अयुब चौहान तसेच नगर परिषद अधिकारी सतीश दंडवते, वैभव निवाते, महेश जाधव, प्रसाद साडविलकर, संतोष शिंदे , वलीद वांगडे, अमोल वीर तसेच अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
महाराष्ट्र जॉईट सेक्रेटरी राजेश वाजे यांनी आपल्या मनोगतात सदरची बोट वापरण्याची वेळ आपल्यावर येवू नये, अशी प्रार्थना करूया. क्रेडाई चिपळूण यांनी नगर परिषदेला विनामूल्य सुसज्ज अशी बोट दिल्याबदल प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांनी सर्वाचे आभार मानले. नगर परिषदेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन नगर परिषदेला अशाच प्रकारे सहकार्य करावे, असे आवाहन केले.