चिपळूण :- चिपळूण नगर परिषद पाग मळा येथील सचिन चंदन यांच्या जागेमधील कठ्ठा नसलेल्या विहिरी मध्ये अनंत गमरे कापसाळ उनाड सोडलेल्या म्हशी चे रेडकू रात्री ११.०४ वाजता विहिरी मध्ये पडल्याचे सुरज कदम व बाजूला राहणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात आले तसेच तातडीने सुरज कदम यांनी नगर पालिका अधिकारी श्री मंगेश पेढांबकर प्रशासकिय अधिकारी ,वैभव निवाते आरोग्य विभाग प्रमुख व प्रसाद साडविलकर यांना फोन करून कल्पना दिली असता तिन्ही अधिकारी व त्याचे सहकारी रोहन सकपाल , तुषार जाधव , जयंत कासार यांच्या सह १० मिनिटा मध्ये हजर होऊन वस्तू स्थितीची पहाणी करून माहिती घेतली आणि तातडीने जे सी बी ,दोरी ,बॅटरी याची व्यवस्था करून जे सी बी चालक नागराज कदम यांच्या कुशलतेने आणि नगर पालिका सेवा ततत्वावरील कर्मचारी हर्ष कांबळी स्वतःहून विहिरी मध्ये उतरून जे सी बी आणि दोरी च्या सहाय्याने म्हशीच्या रेडकू ला जीवत बाहेर काढले नगर पालिका अधिकारी कर्मचारी यांच्या बरोबर सामाजिक कार्यकर्ते महेश कांबळी ,सुरज कदम , अमोल तटकरी , प्रथमेश तटकरी , व अन्य नागरिकांचेही सहकार्य रेडकू बाहेर काढताना मिळाले.
रात्री च्या वेळी तातडीने सर्व यंत्रसामुग्री आणून एका मुक्या प्राण्याचे जीव वाचवत असताना नगर पालिका अधिकारी कर्मचारी याची असलेली तळमळ याबदल तेथील नागरिकांनी अनुभवले
एका मुक्या जनावरचा जीव वाचवल्या बदल सर्वांनी आनंद व्यक्त केला आणि नगर परिषदेला धन्यवाद दिले