चिपळूण:-पान टपऱ्यावर छुप्यापध्दतीने गांजा विक्री होत असल्याने पेलिसांकडून शहरासह परिसरात टपऱ्या तपासणी मोहीम सुरु आहे. असे असताना शुक्रवारी या तपासणीत खेर्डी-मोळेवाडी येथे एका पान टपरीमध्ये पोलिसांना 60 ग्रॅम गांजा सापडल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयित टपरीचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी हा गांजा कोणाकडून आणला हे पोलीस तपासणीतून पुढे येणार आहे.
साईराज मनोहर कदम (खेर्डी) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. अधून-मधून ही तपासणी मोहीम राबवली जात असताना शुक्रवारी शहरालगतच्या खेर्डी-माळेवाडी येथे एका पान टपरीची पोलिसांनी तपासणी सुरु असता त्यामध्ये 11 पुड्यांमध्ये 50 ते 60 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून याप्रकरणी संशयित म्हणून साईराज कदम याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, हा गांजा कोणाकडून खरेदी केला शिवाय याचे कनेक्शन कुठपर्यंत आहे, तसेच यामध्ये आणखी कितीजण सहभागी आहेत हे पोलीस तपासातून पुढे येणार आहे.