संगमेश्वर:-अवघ्या 22 व्या वर्षी अपघाती मृत्यू झालेल्या कबड्डीपटूच्या मृत्यूने गाव हळहळला. गरीबीमुळे 12 वी नंतर मुंबई गाठुन नोकरी करून कबड्डी खेळणाऱ्या दिनेश विजय धामणे (वय 22, विघ्रवली) या कबड्डीपटूच्या अपघाती निधनाने संगमेश्वर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
दिनेश विजय धामणे हा गुणी खेळाडू शालेय स्तरावर कबड्डी खो-खो मध्ये जिल्हा आणि राज्य स्तरावर खेळलेल्या या खेळाडूने आपले 12 वी पर्यंत शिक्षण गावी पूर्ण केले होते. घरातील आई-वडील शेती मधून उदरनिर्वाह करत असल्याने भावाच्या पाठोपाठ त्यांने त्याला जोड देण्यासाठी मुंबई गाठली. नोकरी करत असताना तो विविध स्पर्धांमध्ये भाग घेत होता. विघ्रवली कबड्डी संघाचा तो खेळाडू होता. मुंबई परेल येथील गुरुमाऊली स्पोर्ट्स क्लब संघाचा उप कर्णधारपदाची तो धुरा संभाळत होता.
मुंबई येथे कामानिमित्त तो जात असताना त्याच्या गाडीला अपघात झाला होता. हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र त्याला मृत्यू ने गाठलेच. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दिनेश उर्फ पांड्या यांच्या दुःखद निधनाने त्यांच्या मित्रांमध्ये शोक व्यक्त होत आहे . “तू आमच्या कायम स्मरणात राहशील” अशा भावना त्यांच्या मित्रांकडून व्यक्त होत आहेत.
अवघ्या 22 वर्षाच्या कबड्डीपटूच्या अपघाती मृत्यूने गाव हळहळला
