ताम्हाने:-संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावात सद्या गवारेड्यांचा मुक्तसंचार सुरु असुन हे गवारेडे आंबा – काजुच्या बागांचे अतोनात नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.
चाफवली गावातील सुरेश चाळके, प्रकाश चाळके यांच्या चाफनाथ मंदिर परिसरातील सतिश भट येथील आंबा, काजुच्या झाडांचे फार मोठे नुकसान केले आहे. काजूची मोठी झाडे या गवारेड्यांनी उखडून फेकली आहेत. आंब्याच्या कलमांचेही मोठे नुकसान केले आहे. चाफवली गावात तसेच पंचक्रोशीत या गव्यांचा फार त्रास होत आहे. हे कळपाने फिरत असल्यामुळे एखाद्या बागेत किंवा शेतात गेले तर पुर्ण शेत भुईसपाट करुन टाकतात. त्यामुळे ब्रयाच शेतकयांनी शेतीच करणे सोडून दिले आहे. माकड, डुक्कर; गवे यांच्या नुकसानीच्या त्रासामुळे शेती करणे कठिण होउन बसले आहे, असे शेतकरी म्हणत आहे. पुर्वी होणारी शेते आज ओसाड पडलेली दिसतात.
देवरुखात गवारेडयांचा धुडगूस, आंबा काजू बागांचे नुकसान
