चिपळूण :– सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे प्रशांत यादव यांचे समर्थक व चिपळूणचे सुपुत्र फैसल पिलपिले यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चिपळूण विधानसभा क्षेत्राध्यक्षपदी निवड झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सुचनेनुसार युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांनी फैसल पिलपिले यांची नियुक्ती केली. या निवडीचे पत्र त्यांना मंगळवारी शहरातील भोगाळे येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात देण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस बशीर मूर्तुझा, जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेठ) बने, नेते प्रशांत यादव, सौ. स्वप्ना यादव, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी, देवरुख शहराध्यक्ष निलेश भुवड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल, अशी अपेक्षा यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.