रत्नागिरी:-रत्नागिरी शहराजवळील खेडशी ते हातखंबा रस्त्यावर एका लोहार दुकानाच्या पाठीमागे अर्धवट शेडच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह 245 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल राजेश साळुखे (रा. साळवी स्टॉप, अजिंक्यनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी 28 मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना मटका जुगार खेळ खेळवित असताना रंगेहाथ सापडला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रतिक कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
खेडशी येथे मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
