रत्नागिरी:-बालिकेवरील अत्याचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राहुल भिकाजी तांबे याचा जामीन अर्ज येथील विशेष न्यायालयाने फेटाळून लावला.
देवरुख पोलीस स्थानकात राहुल तांबे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. इन्स्टाग्रामवरुन राहुल व बालिकेची ओळख झाली होती. त्यांनी एकमेकांना मोबाईल दिले होते. त्यानंतर त्यांचे बोलणे सुरु झाले होते. पुतणीच्या बारशाला आपण जाऊया असे आरोपीने सांगितले. हा कार्यक्रम देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे होता. बालिकेच्या काकुने देवगडला जाण्यासाठी तिला परवानगी नाकारली. म्हणून तीने शाळेत जाते असे सांगून ती देवरुख बस स्टॅड वर आली. तीने आरोपी राहुल याला फोन केला. ती बारशाला येत असल्याबाबत कळवले. राजापुर येथे घ्यायला ये असे आरोपीला तीने सांगितले. राजापुरला पोहचल्यावर तीने फोन केला. आरोपीने मोटारसायकलवरुन येत असल्याबद्दल तिला सांगितले. आरोपी तेथे पोहोचल्यानंतर फोटोग्राफवरुन त्यांनी एकमेकांना ओळखले.
यानंतर ते दोघे देवगड येथे गेले. रात्री जेवण झाल्यावर ते दोघे तेथेच राहीले. पिडीत बालिका 15 वर्ष 6 महिने वयाची तर आरोपी दुप्पट वयाचा असल्याचे कथन न्यायालयात करण्यात आल्याचे निकालपत्रात नमुद करण्यात आले आहे. हे प्रकरण विशेष न्यायाधीश एस.एस. गोसावी यांच्या समोर सुनावणीस आले. त्यावेळी आरोपीच्या वकीलांनी सांगितले की पिडीत बालिका स्वतहून घरातून निघून आली आहे. बारशाचा कार्यक्रम रात्री उशीरापर्यंत पार पडला.
बालिकेनेच रात्री तेथे राहण्याचा आग्रह धरला. कोणतीही जबरदस्ती झाल्याचे पुरावे नाहीत. राहूल तांबे हा देवगड तालुक्याचा रहीवासी आहे. सरकारी वकीलांनी सांगितले लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. न्यायालयाने आपल्या निकालपत्रात नमुद केले की अज्ञान बालिकेची संमत्ती ही महत्वाची नाही. आरोपी हा दबाव आणण्याची शक्यता असल्याने जामीन मंजूर करता येण्या जोगा नाही. असे नमुद करुन जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला.
बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा जामीन अर्ज फेटाळला
