चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे बाजारपेठ येथे उभी करुन ठेवलेली दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत आकाश दिलीप कोकाटे (30 सावर्डे-बाजारपेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आकाश ही दुचाकी सावर्डे बाजारपेठ येथे 25 ते 26 मे या कालावधीत घरासमोर उघड्या जागेत उभी करुन ठेवली होती. असे असताना चोरट्याने ही दुचाकी चोरुन नेली. हा प्रकार आकाश याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या बाबत दिलेल्या फिर्यादीनुसार सावर्डे पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भर बाजारपेठेतून दुचाकी चोरीला
