खेड / प्रतिनिधी:-मुंबई गोवा महामार्गावरील भरणे येथील उड्डाणपुलावर टाकण्यात आलेल्या ‘रंबळ’ पट्ट्यांमुळे अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात जितेंद्र दिलीप कुडाळकर (33, रा. सावर्डे चिपळूण) गंभीररित्या जखमी झाला. उड्डाणपुलावर नव्याने टाकण्यात आलेल्या ‘रंबळ’ पट्ट्यांमुळे त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात घडल्याचे समोर आले. स्थानिक ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर ‘रंबळ’ पट्टे तातडीने हटवण्यात आले.
जितेंद्र कुडाळकर हा (एम.एच 08/के. 2395) क्रमांकाच्या दुचाकीवरून खेडवरून रत्नागिरीच्या दिशेने जात असताना नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघाताचे वृत्त कळताच स्थानिक पोलीस व सामाजिक कार्यकर्ते सुरेश हंबीर तातडीने घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जखमी दुचाकीस्वारास उपचारासाठी तातडीने कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
खेड येथे ‘रंबळ’ पट्ट्यांमुळे अपघात, दुचाकीस्वार गंभीर
