मुरुड:-मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील गणपती गवंड समुद्रकिनारी बुधवारी ८० किलो वजनाचा एक डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आल्याने स्थानिक व प्राणी मित्रांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
येथील गणपती गवंड समुद्रकिनारी कांदळवन फाऊंडेशनचे सदस्य जयेश विश्वकर्मा व ग्रामस्थ चिन्मय सोनावणे यांना १८३ से.मी.लांबीचा व ८० किलो वजनाचा डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळून आला.त्यांनी मुरुड येथील वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी लगेच वनपाल विजय कोसबे, वनरक्षक किरण गायकर व मजूर अनिल चोरघे यांना आदेश देताच नांदगाव येथे घटनास्थळी दाखल होऊन मृत डॉल्फिन ची पाहाणी करून रितसर पंचनामा करण्यात आला असून पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले.सदर मृत डॉल्फिन मासा हा परिशिष्ट -१ या वन्यजीवात मोडत असल्याने निसर्गाची मोठी हानी झाली असून यांच्या संरक्षणासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी प्राणी मित्र व निसर्ग प्रेमींकडून होत आहे.
मुरुड समुद्रकिनारी आढळला ८० किलो वजनाचा मृत डॉल्फिन
